Amazon Ad

कागदपत्रे दाखविली, मदत करा म्हणे अन् पैशांची भीक मागताना हजारोच्या वस्तूवर मारला डल्ला! शेगावची घटना, नेमके प्रकरण काय बातमीत वाचा..

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) कागदपत्रे दाखवून पैशांची भीक मागणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने २५ हजार रुपयांच्या मोबाईलवर हात मारला. शहरातील खेतान चौकात ही घटना घडली असून अज्ञात चोरट्या विरोधात शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 याबाबत नितीन बद्री प्रसाद अवस्थी (४२ वर्ष) यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली, एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या दुकानात आला व त्याचे जवळील कागदपत्रे दाखवून काही पैशांची मदत करा असे म्हणाला. त्यावेळी कागदपत्रे दाखवत असताना अवस्थी यांचा मोबाईल काउंटर वर ठेवलेला होता. सदर अनोळखी व्यक्ती त्याचे कागदपत्र दाखवून दुकानातून निघून गेल्यानंतर काउंटरवर असलेला मोबाईल दिसून आला नाही. दुकानात पैसे मागण्या करता आलेल्या अनोळखी व्यक्तीने मोबाईल चोरी केला अशी तक्रार अवस्थी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.