तो म्हणे लग्न कर, ती म्हणे नाही! शेगावच्या लॉजवर तिच्यासोबत लई वाईट घडल; तरुणी पोलिसांत जाऊन ढसाढसा रडली..

पिडीत २२ वर्षीय तरुणी वर्षभराआधी छत्रपती संभाजीनगरात एका लग्नासाठी आली होती. त्याच लग्नात बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर तालुक्यातील हरणखेडचा सिद्धांत मुरलीधर खाचणे (२८) हा सुद्धा होता. यावेळी तरुणीची सिद्धांत सोबत ओळख झाली. हळूहळू दोघांचे फोनवर बोलणे वाढले, आणि दोघांचा इश्क जुळून आला. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. सिद्धांत ने त्याच्या मोबाईल मध्ये तिचे अनेक फोटो काढले.
तो म्हणे कर ती म्हणे नाही..
दरम्यान काही दिवसांआधी सिद्धांत ने तिच्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावला. आपण प्रेमविवाह करू असे सिद्धांत तिला म्हणत होता,मात्र तिचा लग्नाला नकार होता. काही दिवसाआंधी तरुणीला सिद्धांत याने खामगावला बोलावले. तिथून जबरदस्तीने मोटारसायकल वर बसून शेगावला नेले. तिथे एका लॉजवर तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, तरुणीचे तसल्या अवस्थेतील फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणी कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून भोसरी येथे गेली तिथल्या पोलीस ठाण्यात जाऊन तिने आपबिती कथन केली. पोलिसांनी सिद्धांत विरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळ शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने प्रकरण शेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.