२५ तारखेला मजुरीसाठी गेले होते, २६ ला सकाळी थेट ज्ञानगंगा नदीपात्रात मृतदेहच आढळला! काय झालं कसं झालं..? ​​​​​​​

 
police station nandura
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  निमगावच्या जवळच असलेल्या नारायणपूर शिवारातील ज्ञानगंगा नदी पात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. यामध्ये नारायणपूरचे माजी सरपंच किसन जयराम भगत (५८,नारायणपूर) यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. 
 

जयराम भगत यांचा साळा अनंत नारायण काकर (४८,नारायणपूर) हा २५ जुलैचे सकाळी १० वाजता पासून मजुरी करण्याकरता गेला होता. त्यादिवशी संध्याकाळी ७  पर्यंतही घरी परत न आल्याने त्याचा शोध घेतला. २६ जुलै रोजी सकाळी ४.३० वाजता मृत अवस्थेत नारायणपूर शिवारातील ज्ञानगंगा नदी पात्रात आढळला. त्यावरून नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस  ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आली आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अस्पष्टता आहे. मृतकाचे पश्चात पत्नी, मुलगी असा बराच आप्त परिवार असून ओम साई फाउंडेशन नांदुराच्या रुग्णवाहिकेच्या सहकार्याने सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यासाठी मदत करण्यात आली. सदर घटनेने परिसरात शोक कळा पसरली आहे.