हुंड्यासाठी बायकोला सिगारेटचे चटके दिले! खामगाव शहर पोलीस ठाण्यात तिने सांगितली आपबिती...

 
Dghh
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने घडत आहेत. यात घरघुती हिंसाचाराच्या घटना अधिक आहेत. जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत १०० पेक्षा अधिक कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. खामगाव शहर पोलीस ठाण्यात एका विवाहितेने दिलेली तक्रार तर धक्कादायक आहे. तिचा उच्चशिक्षित असलेला नवरा तिला हुंड्यासाठी सिगारेटचे चटके देत होता असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
  आकांक्षा निलेश भारद्वाज(३०) या विवाहितेने ही तक्रार दिली आहे. निलेश भारद्वाज(३३) याच्याशी तिचे लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस सासरच्या लोकांनी तिला चांगली वागणूक दिली, मात्र नंतर तिचा प्रचंड छळ करण्यात आला.
तिचा नवरा दारुडा होता, दारूच्या नशेत त्याने बायकोला सिगारेटचे चटके दिले. घरातील वस्तू, कार घेण्यासाठी माहेरवरून पैसे आण असा तगादा सासरच्या मंडळींनी लावला होता असे तिने तक्रारीत म्हटले होते. तक्रारीवरून खामगाव पोलिसांनी विवाहितेचा पती निलेश भारद्वाज याच्यासह तिचा सासरा, सासू व दिरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.