सख्ख्या मावसबहीणीवर वाईट नजर टाकली, पळवून नेऊन केला बलात्कार! पोलिसांना देत होत चकमा पण अंढेरा पोलिसांनी उचलून आणलेच! वाचा नेमके काय आहे प्रकरण...

 
Gxbfb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोनच दिवसांपूर्वी अंढेरा पोलिसांनी चंदनपुर येथे घडलेल्या परप्रांतीय मुलीच्या हत्याप्रकरणातील आरोपींना २४ तासांच्या आत अटक करून कौतुकास्पद कामगिरी केली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा अंढेरा पोलिसांनी एक दमदार कारवाई केली आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी जामिनावर सुटल्यावर फरार झाला होता, त्याला पुन्हा जेरबंद करण्यात अंढेरा पोलिसांना यश आले आहे.
 २०१६ मध्ये अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखली तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. मुलीच्या वडिलांनी तशी तक्रार दाखल केली होती. तपासाअंती मुलीच्या सख्या मावसभावानेच अपहरण केल्याचे समोर आले होती. पोलिसांनी आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका केल्यानंतर तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा जबाब दिला होता.त्यावरून पोलिसांनी आरोपी रंजीत किसन पारवे( रा.लोणी खुर्द, जि वाशिम) याच्याविरुद्ध अपहरण, व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. मात्र जामीनावर सुटका झाल्यानंतर जामीनाच्या अटी शर्तीचे पालन केले नाही. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून तो फरार होता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे अंढेरा पोलिसांनी सापळा रचून त्याला वाशिम जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीची आज कारागृहात रवानगी करण्यात आली.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.मालवीय यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांच्या आदेशाने पोहेकॉ विलास काकड, होमगार्ड राजू केदार यांनी केली.