स्वतःच कापला स्वतःचा गळा! २० वर्षीय तरुणाने जीवन संपवले; त्याआधी मित्राला व्हाट्सअप वर पाठवली चिठ्ठी! मलकापुरातील थरार...

 
Malkapur
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वतःच्याच गळ्या वर धारदार शस्त्राने वार करीत २० वर्षीय तरुणाने आपली जीवन यात्रा संपवली. काल,२१ ऑगस्टच्या दुपारी मलकापुरात ही थरारक घटना घडली. तेजस महादेव सोनवणे असे तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर शहरातील सालीपुरा भागात तेजस त्याच्या कुटुंबासह राहत होता. घटनेच्या वेळी तेजस घरात एकटाच होता. त्याचे आई-वडील दवाखान्यात गेलेले होते. तेजसचे आजी आजोबा घराबाहेर बसलेले होते. घरात कोणीच नसल्याचे पाहून तेजसने धारदार शस्त्राने स्वतःच्याच गळ्यावर वार केले. तेजस रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. घरात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. तेजसने एवढा टोकाचा निर्णय का घेतला ? त्याचे कारण समजू शकले नाही मात्र तेजसने टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या मित्राला व्हाट्सअप वर एक चिठ्ठी पाठवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या चिठ्ठीत तेजसने नेमकं काय लिहिलय हे पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे...