Amazon Ad

घरात घुसला अन् म्हणे तु मला आवडते; सोनाळ्याची घटना...

 

संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील २३ वर्षीय महिला घरात एकटी असल्याचे पाहून घरात अनधिकृत प्रवेश करून वाईट उद्देशाने महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी ३१ मे रोजी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाळा येथील महिला एकटी घरी असल्याचे पाहुन घरात प्रवेश करून वाईट उद्देशाने हात पकडून तू मला खुप आवडते, असे म्हणून विनयभंग केला. तसेच यापूर्वी महिलेचा गावात पाठलाग केला होता, अशी तक्रार महिलेने सोनाळा पोलीस ठाण्यात दिली . यावरून आरोपी शेख रहेमत शेख आमद रा. सोनाळा याच्या विरूध्द कलम ३५४, ३५४ (ड) ४५१ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल केले आहे. अधिक तपास सोनाळा पोस्टेचे ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो हे कॉ विनोद वानखडे करित आहे.