'शस्त्र परवानाधारकांनो तुमच्या जवळील शस्त्र आताच जमा करा' ! नाहीतर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी होवू शकतो तुरुंगवास !

 
बुलडाणा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये राजकीय नेत्यांसह सामान्य जनतेला काही बंधने घालून दिली आहे. त्यापैकीच एक म्हणजे शस्त्र परवाना धारकांना त्यांच्याकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्याचे सांगितले आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी जिल्ह्यातील पूर्ण ३४ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या असून ठाणे निहाय परवानाधारकांशी संपर्क केला जात आहे. निवडणूक झाल्यानंतर परवानाधारकांना त्यांची शस्त्रे परत दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. 
 १६ मार्च रोजी, दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. मतदानाच्या तारखांची घोषणा झाली. आणि देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यांनतर रात्री ७ वाजेच्या सुमारास शहरातील एकावर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. यंदाच्या लोकसभा निवडणुकी दरम्यानचा तो पहिला गुन्हा नोंदविण्यात आला. तलवार, देशी कट्टा , पिस्तूल बाळगणाऱ्या परवानाधारकांना मिळालेल्या पोलिसांच्या सूचनेनुसार जिल्हाभरातील शस्त्रे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.