'लालच बुरी बला है' ! दुप्पट पैशांच्या आमिषात महिलेने गमावले दीड लाख रुपये! शेगाव पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात..

 
Jfkf
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ' लालच बुरी बला है' ही कथा सगळ्यांनी लहानपणी ऐकलीच असेल. परंतु यातून बोध कुणी घेतला? कोण सतर्क झाले. हे ज्याचं त्याला माहिती. आजही जास्त पैसे मिळविण्याच्या नादात अनेकांची फसवणूक होते. कुठे ना कुठे दररोज फसवणुकीच्या घटना उघडकीस येतात. अशीच एक बातमी शेगाव शहरातून समोर आली आहे. परभणी येथील एका महिलेला दीड लाख रुपयांनी चुना लागला. ११ जूनच्या रात्री महिलेने शेगाव पोलिसात तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतली असून दोघे अजूनही फरार असल्याची अपडेट आहे.
शेगाव शहरातील एमएसईबी चौकात १० जून रोजी सकाळी ८.३० वाजता घटना घडली. परभणी येथील गुल अफरोझ शेख हुसेन (४१ वर्ष) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. 'तुम्ही मला जेवढे पैसे द्याल त्याचे आम्ही तुम्हाला दुप्पट पैसे देतो' असे म्हणत चौघांनी लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा देऊन १ लाख ५० हजार रुपयाने फसवणूक केली. अशी तक्रार महिलेने शेगाव पोलीस ठाण्यात दिली. यावरून चौघांविरुद्ध ११ जून रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू झाला.  
 जगन्नाथ विश्वनास रोठे, विनोद नीवृत्ती धामोळकर, वीष्णु शेलारकर व केशव या चौघांनी संगणमत करून गुल अफरोझ शेख हुसेन या महिलेचे १ लाख ५० हजार रुपये घेवुन प्लॉस्टीकच्या थैलीमध्ये ५०० रु. चे ३ लाख रुपयांचे नोटाचे बन्डल देऊन निघुन गेले. काही वेळानंतर महिलेने नोटाचे बंन्डल तपासले असता सगळ्या नोटा लहान मुलांचे खेळण्यातील असल्याचे दिसून आले. शेगाव शहर पोलिसांनी तक्रारीवरून जगन्नाथ विश्वनास रोठे (५८) रा. खुदावतपुर ता नांदुरा, विनोद नीवृत्ती घामोळकर (४२) खुदावतपुर ता नांदुरा, वीष्णु शेलारकर रा पातुर व केशव या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपासात शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आशिष गद्रे, पोहे का गणेश वाकेकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गव्हांदे यांनी तपासचक्रे फिरवून नांदुरा तालुक्यातील खुदावतपुर येथील जगन्नाथ रोठे ५८), विनोद धामोळकर (४२) या दोघांना मोबाईल लोकेशनद्वारे नांदुरा येथून ताब्यात घेऊन अटक केली. यातील दोन जण अजून फरार आहेत.