बँकेतून पैसे काढून मुलासोबत घराकडे पायी जात होत्या आजी!;मध्येच दुचाकीने उडवले; जीव गेला! खामगाव तालुक्याती गणेशपुरची घटना

 
crime

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बॅक मधून पैसे काढून आपल्या मुलांसोबत घरी येतांना अज्ञात दुचाकीने ६२ वर्षीय वृद्धेला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथे घडली आहे.

गंगुबाई परमसिंग साबळे वय वर्ष ६२ ( रा. नागझरी खुर्द ता - खामगाव) या २३ ऑगस्ट रोजी दोन वाजताच्या दरम्यान गणेशपुर (ता खामगाव) येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथे त्यांच्या मुलासह पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. त्या पैसे काढून खामगाव ते चिखली हायवे रोडने पाई जात होत्या. यावेळी नागझरी खुर्द गावाकडे येत असतांना साहेबराव कोकरे यांच्या शेताजवळ कोणातरी अज्ञात दुचाकीस्वाराने गंगुबाई साबळे यांना मागून धडक दिली, त्यामुळे त्यांचे डोके फुटले, त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे आणले होते. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याने त्यांना सिल्वर सिटी हॉस्पिटल खामगाव येथे दाखल केले होते. मात्र संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अशी तक्रार परतिभान साबळे (५०) वर्ष यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला २४ ऑगस्ट रोजी दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी साराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल चव्हाण करीत आहेत.