नशीबच फुटकं ! लग्न होऊन ६ दिवस झाले होते; देवदर्शनासाठी शेगावला आले! दर्शन झाल्यावर हॉटेल ला रूम घेतली! नवरा बाथरूमला गेला अन् ती गायब झाली...

 
ghjk
शेगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हल्ली नात्यात तेवढा ओलावा राहला नाही..कधी कोण कुणाला सोडून जाईल याचा नेम नाही..लग्न झालेल्या विवाहिता देखील बेपत्ता होण्याच्या घटना आता वाढायला लागल्यात. शेगावच्या एका लॉजमधून तर धक्कादायकच बातमी समोर आली आहे. लग्न होऊन नुकतेच ६ दिवस झालेली विवाहिता देवदर्शन करण्यासाठी शेगावात आली होती..मात्र नवरा बाथरूमला गेला अन् ती गायब झाली..! नवऱ्याने आता पोलीस ठाण्यात बायको हरवल्याची तक्रार दिली आहे.
 

प्राप्त माहितीनुसार जळगाव खान्देश येथील सुभाष शालीग्राम चौधरी यांचे २२ मे ला यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील मोहा येथील शितल (२४) लग्न झाले होते. दोन्हीकडील सत्यनारायण आटोपल्यावर दोघे पती पत्नी २८ मे रोजी शेगावला देवदर्शनाला आले होते. शेगावात श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यावर त्यांनी हॉटेल यशश्री पॅलेस येथे रूम घेतली केली. रूम मध्ये गेल्यावर पती सुभाष चौधरी हा बाथरूम मध्ये गेला .बाथरूम आल्यावर त्याला बायको दिसली नाही..सगळीकडे शोध घेतल्यावर बायको गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पतीने शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. ५ फूट २ इंच उंचीची शीतल मजबूत बांध्याची असून तिचे नाक सरळ, रंग सावळा आहे. अंगात हिरव्या रंगाचे ब्लाऊज असून लाल रंगाची साडी त्या दिवशी घातलेली होती. अशा वर्णनाची महिला दिसल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.