प्री- वेडिंगला जाऊन जोडप्याने कोकणात रात्री "नको ते" केलं! "पाहिजे तशी" न मिळाल्याने नवरदेवाने लग्न मोडलं; जुनी घटना पुन्हा एकदा तशीच घडली पण लोक नाही सुधरली.! सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

 
Goa
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्री- वेडिंग शूटसाठी गोव्याला गेल्यानंतर एक रात्र भावी पती पत्नीने एकत्र मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरदेवाला नवरी पाहिजे तशी नसल्याचा साक्षात्कार झाला आणि त्याने लग्न मोडल्याची घोषणा केली..चिखली तालुक्यात २ वर्षाआधी घडलेली ही घटना राज्यभरात गाजली होती. अनेक सामाजिक बैठकांमधून प्री - वेडिंग वर बंदी व्हावी अशा चर्चाही झाल्या होत्या.मात्र काळ ओसरला तसे पुन्हा सगळ सुरू झालं..आता पुन्हा एकदा सिंदखेडराजा तालुक्यातून आता एक नवीन घटना समोर आली आहे. प्री- वेडिंगला गेलेल्या जोडप्याने एक रात्र हॉटेलात एकत्र मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी भावी नवरदेवाने आपल्याला लग्न करायचे नसल्याचे सांगितले. "तू मला पाहिजे तशी नाही" असे म्हणत नवरदेवाने लग्न मोडले.
  प्राप्त माहितीनुसार नवरदेव नवरी दोघे सिंदखेडराजा तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतील आहेत. नवरदेव पेशाने सिव्हील इंजिनिअर असून पुण्यात राहतो. नवरीचे देखील पदवीचे शिक्षण झालेले आहे. मार्च महिन्यात दोघांची सोयरिक झाली. मे महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. साखरपुडा झाल्यानंतर २१ एप्रिलला हे जोडपे कोकणात प्री- वेडिंग शूटसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत दोन फोटोग्राफर आणि नवरीची एक विवाहित मैत्रीण देखील होती. २२ एप्रिलच्या रात्री या टीमने एका हॉटेलात मुक्काम केला. ३ वेगवेगळ्या रूम बुक केल्या होत्या.
   सकाळी उठल्यानंतर निर्णय बदलला..
२२ एप्रिलला दिवसभर ठिकठिकाणी शूट करीत असताना दोघा भावी पती पत्नीने एकमेकांवर प्रेमाचे रंग उधळले. दोघांच्या नात्यातील वीण अधिक घट्ट होत असल्याचे दिवसभर दिसत होते. दरम्यान रात्री नवरीची विवाहित मैत्रीण आणि नवरी एका रूममध्ये, दोन फोटोग्राफर एका रूम मध्ये आणि नवरदेव एका रूममध्ये झोपलेले होते. रात्री नवरदेवाने नवरीला त्याच्या रूममध्ये बोलावले. दोघांनी एकाच रूममध्ये मुक्काम केला. सकाळी नवरदेव एकटाच उठला आणि कुणालाही काही न सांगता निघून गेला. थोड्या वेळाने सगळे उठल्यानंतर नवरदेव दिसत नसल्याचे पाहून सगळेच हैरान झाले. त्याने फोनही बंद करून ठेवला. दुपारी २ वाजता नवरदेवाचा नवरीच्या विवाहित मैत्रिणीला फोन आला." मला तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण ती तशी नाही..मी तिच्यासोबत लग्न करू शकत नाही" असे सांगून नवरदेवाने फोन कट केला. नवरदेवाच्या अशा वागण्याने सगळेच हैराण झाले. त्यानंतर फोटोग्राफर सोबत नवरी आणि तिची विवाहित मैत्रीण गावाकडे परतली. याप्रकरणात या घटनेनंतर दोन्हीकडील मंडळींच्या ३ बैठका झाल्या मात्र नवरदेव ऐकायला तयार नाही. आता नवरीकडील मंडळी नवरदेवाच्या विरोधात कायदेशीर तक्रार देण्याच्या तयारीत असल्याचे समजते, त्यामुळे तरी नवरदेव वठणीवर येईल..