चिखलीत "त्या" घरांपुढे जाऊन तीनदा हॉर्न वाजवा; त्याला कळून जाईल तुम्हाला काय हवंय ते! बुलडाणा लाइव्ह कडे "तसला" व्हिडिओ..तो पाहून तरी पोलीस कारवाई करतील?

 
Hjxhx
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अख्ख्या जिल्ह्यात कुणालाही विचारा..नंबर दोन चे धंदे सर्वात जास्त कुठे चालतात...ते "चिखली"च नाव सांगतील..अर्थात पोलीस नेहमीप्रमाणे याला नकार देतील तो भाग वेगळा..जे कुठ मिळत नाही ते चिखलीत मिळत म्हणत्यात..आता या मिळणाऱ्या गोष्टींनी कॉलेजच्या पोरांना देखील विळख्यात पकडल्याच समोर येतंय..तसला एक व्हिडिओच बुलडाणा लाइव्ह ला प्राप्त झाला असून उद्या तो सविस्तर वृत्तासह प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली शहरातील बाबुलॉज चौक परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. माय बाप लाखो रुपये खर्चून पोरांना शिकायला शहरात पाठवतात..मात्र पोरं भलत्याच प्रकाराला बळी पडतात..असाच प्रकार शहरातील नामांकित महाविद्यालयाजवळ देखील पार पडत असल्याचे सूत्रांनी सांगितले..पोलिसांना याची अगदी कल्पनाच नसेल असे नाही, पण देव जाणो काय होत असेल ते....सविस्तर वृत्त उद्या...