४० लाख रूपये दे और छुट जा, पैसे नहीं दिया तो तेरे घर में बिवी और तेरी २ बेटी रहती है, सबका गेम कर दुंगा! दिल्लीचा गँगस्टरचा निरज बवानाच्या नावाने बुलडाण्यात मागितली खंडणी! ​​​​​​​

 
fghj

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शांत व सयंमी ओळख ठेवून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात अलिकडे गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत असल्याचे वारंवार समोर येत आहे. दादागिरीच्या भाषेत हात-पाय तोडण्याचे प्रकार असो, वा अवैध व्यवसायाला पोलिसांचे छुपे बळ असो, हे 'क्राईम रेट' वाढविण्यास पोषक ठरत आहे. दिल्लीच्या कुख्यात गँगस्टरच्या नावाने बुलडाण्यात एका कुटुंबाला धमकविण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता तब्बल ४० लाख रुपयांची खंडणी मागुन न दिल्यास 'गेम' करण्याची धमकी सुध्दा देण्यात आली. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

बुलडाणा शहरातील केशव नगर भागात वास्तव्यास असलेले म्युचल फंड डिस्ट्रिब्युटर पंकज अरुण खर्चे ( वय ४२) यांच्या मोबाईलवर ८ जुलैच्या सायंकाळी ५.३५ वाजता दरम्यान एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. मला तुझी सगळी कुंडली माहीत आहे. मला ४० लाख रुपये दे, तु जर पैसे दिले नाही, तर मी तुझा गेम करूण टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर खर्चे घरी गेले व जेवन करून झोपून गेले. दरम्यान  ९ जुलैच्या सकाळी ६.१५ वाजता दरम्यान झोपेतून उठून अंगणात गेले, त्यावेळी त्यांच्या कारच्या मागील बाजुचा काच फुटलेला दिसला. तसेच कार जवळ दोन दगडाखाली ठेवेलेली एक धमकीची चिठ्ठी दिसली. त्यांनी चिठ्ठी वाचुन पाहीली असता, तीच्यावर मैने तुझे फोन किया था, मैं निरज बवाना का राइट हैंड हु, मै तुम्हे ३ दिन का टाइम देता हु, ४० लाख रूपये दे और छुट जा, पैसे नहीं दिया तो तेरे घर में बिवी और तेरी २ बेटी रहती है, सबका गेम कर दुंगा, अशा आशयाच्या हिंदी भाषेत धमक्या लिहलेल्या दिसल्या. या प्रकरणी पंकज खर्चे यांनी बुलडाणा शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार काटकर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत. 

तपासचक्र फिरवली...

दरम्यान, ठाणेदार काटकर यांनी सदर बाब गांभीयाने घेऊन तात्काळ खर्चे यांच्या घरी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करुन उपरोक्त चिठ्ठी ताब्यात घेण्यात आली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपीचा काही सुगावा लागतो का ?याचा शोध सुरु केला आहे.