२५ लाख द्या, मोबदल्यात दीड कोटी देतो म्हणून तिघांना गंडवले! २५ लाख घेऊन लहान मुलांच्या खेळण्यातल्या नोटा दिल्या! संग्रामपूर तालुक्यातील दोघे सोलापूर पोलिसांच्या ताब्यात ​​​​​​​

 
hj

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा). आम्हाला २५ लाख रुपये द्या, त्याच्या मोबदल्यात तुम्हाला दीड कोटी मिळवून देतो, असे म्हणून सोलापुरातील तिघांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी १ धानोरा हवेली व संग्रामपूर तालुक्यातील दोघे अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संग्रामपूर तालुक्यातील दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

add

                                ( जाहिरात )

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिघांना भेटून झटपट श्रीमंत होण्याचा मोह दाखविला. २५ लाख द्या, त्या बदल्यात दीड कोटी   मिळवून देतो, असे त्यांनी सांगितले असता या अमिषाला बळी पडून एकाने २१ लाख व दोघांनी प्रत्येकी दोन लाख दिले. धानोरा हवेली येथील एक व संग्रामपूर तालुक्यातील दोघांनी २५ लाख घेऊन त्या बदल्यात चिल्ड्रन बॅकेच्या नोटा देऊन फसवणूक केली. या घटनेच्या तपासमारी सोलापूर ग्रामीण पोलीस संग्रामपूर तालुक्यात पोहचले होते. पोलिसांनी एकाला संग्रापुरातून आणि एकाला टुनही येथून ताब्यात घेतले असून काही रोकडही जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत तामगाव पोलीस ठाण्यात नोंद करुन पुढील तपासासाठी या दोघांना सोलापूर येथे नेण्यात आले.