दुचाकी चोरट्यांची टोळी ताब्यात, सात दुचाक्यांसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई...

 
Gfjm
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दुचाकी चोरणाऱ्या तिघांना बोराखेडी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ३ लाख ९५ हजार रुपयांच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. बोराखेडी पोलिसांनी १८ एप्रिलला ही कारवाई केली. 
    
Advt
Advt.👆
खरबडी येथील मोहसीन शाह यांची 17 एप्रिल रोजी खरबडी रोडवरील दुकानासमोर एमएच १४ एएफ ८६८३ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली होती. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गोपडिया माहितीच्या आधारे खरबडी रोडवरील आयान खान नूरहसन खान याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून ती दुचाकी जप्त करण्यात आली होती. त्यासह विना क्रमांकाची आणखी एक दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली असून चौकशीतून शेख मुज्जमिल शेख रफिक , विश्वराज प्रकाश सुरडकर (रा. रिधोरा) या दोघांची नावे समोर आली. त्यांना ताब्यात घेतले असा त्यांच्याकडूनही पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.