घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार!

फोटो व्हायरल झाल्याने बिंग फुटले!!; देऊळगाव राजा शहरातील घटना
 
 
धक्कादायक… सरकारी नोकरीच्‍या आमिषाने ३० वर्षीय परिचारिकेवर सामूहिक अत्‍याचार!

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केला. मात्र तिने नकार दिल्यानंतर त्‍याने तिच्यासोबतचे फोटो मुलीच्या आत्‍येबहिणीला पाठवले आणि बिंग फुटले. पीडितेच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. देऊळगाव राजा शहरात ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

नीलेश खरात (रा. जंबकनगर,देऊळगाव राजा) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी १३ वर्षांची असताना नीलेशचा तिच्यावर डोळा होता. मार्च २०१९ तर १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत नीलेशने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला वारंवार घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जेव्हा पीडित मुलीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला, तेव्हा नीलेश तिच्या मागे मागे जाऊन तिच्या वर्गात जायचा.

भर वर्गात जाऊन तू माझ्याशी का बोलत नाही असे म्हणून तिला त्रास द्यायचा. तरीही मुलगी ऐकत नसल्याचे पाहून त्‍याने मुलीसोबत काढलेले फोटो मुलीच्या आत्‍येबहिणीच्या मोबाइलवर पाठवले. त्‍यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या आई- वडिलांनी नीलेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्‍याने त्‍यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या नीलेशविरुद्ध २१ नोव्‍हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरारी असून, त्याचा शोध घेणे सुरू आहे. त्‍याला पकडल्यानंतर त्‍याचे वयही निष्पन्‍न होणार आहे.