आधी स्टेटस ठेवले" अंत्यविधीचा प्रारंभ"! नंतर छतावरून पडून मलकापूरच्या तरुणाचा मृत्यू! नेमक काय असेल कारण?

 
Vbji
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मलकापूर येथील एका २३ वर्षीय तरुणाचा छतावरून पडून मृत्यु झाला. शहरातील गाडेगाव मोहल्ला परिसरात ही घटना घडली. राकेश विनोद रायपुरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मलकापूर शहरातील गाडेगाव हनुमान मंदिर परिसरात राहणाऱ्या राकेशचा मृतदेह आढळला. घराच्या छतावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र असे असले तरी घटनेच्या काही वेळ आधी त्याने व्हाट्सअप वर "अंत्यविधीचा प्रारंभ" असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्याने खरचं आत्महत्या केली की हा अपघात आहे याबाबतचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.

आत्महत्या असेल तर त्याने संबधित स्टेटस "खास" व्यक्तीला दिसावे म्हणून ठेवले का?  की अन्य दुसऱ्या कारणाने आत्महत्या केली याबाबत मलकापूर शहर पोलिस तपास करीत आहेत. मलकापूर शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.