आधी फेसबुकवर मैत्री, नंतर आमिष दाखवून ठेवले संबंध, नको ते व्हिडिओ काढले अन् केले मोठे कांड! शेगावच्या २४ वर्षीय तरुणीचा फेसबुक फ्रेंडने घात केला..
सचिन जोगदंडे याने पिडीतेशी मैत्री केली खरी परंतु त्याच्याविषयी संपूर्ण खोटी माहिती दिली होती. बनावट मैत्रीच्या नावाने पिडीतेला ब्लॅकमेलिंगसाठी जाळ्यात ओढले. गोड बोलत पिडीत तरुणीला वेगवेगळे आमिष दाखवून अनैतिक संबंध ठेवले. त्यावेळी तिला समजू न देता नको त्या अवस्थेमधील फोटो, व्हिडिओ सचिन याने काढून ठेवले. त्यांनतर त्याने खरा रंग दाखवला.. "तुझ्या नातेवाईकांमध्ये व्हिडिओ व्हायरल करेल" अशा धमक्या देऊन पिडीतेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. " तू माझ्यासोबत राहा नाही तर तुझे सगळे फोटो व्हायरल करतो" अशा धमक्या दिल्याने पीडित तरुणी त्याच्यासोबत राहत होती.
यादरम्यान तिला मारझोडही करण्यात आली. या गैरकृत्यात सचिन जोगदंडे याच्यासह त्याचे तीन ते चार अनोळखी मित्र सुद्धा सहभागी झाले आहेत. या सर्वांनी पिडीतेवर दबाव आणून वेगवेगळ्या फोनद्वारे फोन करून पैशांची मागणी केली. ९ मेरोजी आरोपी सचिन जोगदंडे याने पिडीतेच्या वडिलांना फोन केला. तो म्हणाला की, 'मुलगी प्यारी असेल तर दोन लाख रुपये आणून दे, नाहीतर तिचे फोटो व व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांमध्ये फोनवर पाठवीन' अशी धमकी दिली. व फोन सुरू असताना पिडीतेला मारहाण देखील केली. असे पिडीत तरुणीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी सचिन जोगदंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.