संतनगरी शेगावात अग्नी तांडव! तीन किराणा दुकानांना आग! सात लाखांचे नुकसान

 
gh
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेगावच्या आठवडी बाजारातील तीन किराणा दुकानांना २८ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागून जवळपास सात लाख रुपयांचे नुकसान झाले.
 

रविवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान आठवडी बाजारात धूर निघताना काही जणांना दिसला. आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी परसली. त्यानंतर आठवडी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अनेकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रयत्न केले. नगर परिषदेच्या अग्निशामक दलामुळे आग आटोक्यात आली. आगीत तिन्ही दुकानातील गहू, इतर किरणा सामान जळून खाक झाले. नगर परिषद, पोलिस प्रशासन, तहसीलदार कार्यालयाचे पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीमध्ये वासुदेव पुरणमल टिबडेवाल यांचे ३ लाख ७१ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले.

अशोक हरिदास राठी यांचे २ लाख २५ हजार रुपये तर गोपाल मदन अग्रवाल यांचे १ लाख ३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे. आगीचे कारण नेमके कळू शकले नाही.