मोटासायकस्वारावर आग्यामोहळाचा हल्ला! जीव गमावला; खामगाव - चिखली रस्त्यावरील घटना
Mon, 20 Feb 2023

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोटारसायकलने जात असतांना आग्यामोहळाने हल्ला केल्याने मोटरसायलकलस्वाराचा मृत्यू झाला. १९ फेब्रुवारीच्या दुपारी खामगाव - चिखली रस्त्यावरील गारडगाव फाट्याजवळ ही घटना घडली. जगन्नाथ देवळे ( ६३, रा. अंत्रज, ता.खामगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार जगन्नाथ देवळे हे मोटरसायकलने चिखली रस्त्याने जात होते. त्याचवेळी भर रस्त्यावर एका आग्यामोहळाने देवळे यांच्यावर हल्ला केला. यामुळे देवळे खाली कोसळले. घटनेची माहिती मिळताच खामगाव नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या देवळे यांना तात्काळ खामगावच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तोपर्यंत देवळे यांचा मृत्यू झाला होता.