महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा! देऊळगाव राजा येथील घटना..

 
Vvbb
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) देऊळगाव राजा येथील एका कंपनीमधील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक उद्धव घुले (रा. संभाजीनगर) आणि सचिन कांबळे (रा.पुणे) या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  याबत पीडित महिलेने रविवारी, ३० एप्रिलला देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित कंपनीमध्ये सुरक्षारक्षक पदावर पिडीत महिला कार्यरत आहे. ह्याच कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक उद्धव घुले व सचिन कांबळे या दोघांनी पीडीतेला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच कधी कंपनीमध्ये तर कधी घरी येऊन वारंवार शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जायभाये करत आहेत.