नवऱ्याच्या कारनाम्याला वैतागली! पोलीस स्टेशनात तक्रार दिली, म्हणे जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून हा...

 
Vhbc

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ग्रामीण भागातील वृद्ध पती-पत्नीच्या नात्याबद्दल सांगताना नेहमी म्हणतात की, पती-पत्नी दोघे संसाराच्या गाड्यातील दोन महत्त्वपूर्ण चाकं आहेत. यातलं एक चाकं जरी विस्कळलं तर अख्खा संसार विस्कळीत होतो. पती पत्नीचा वाद, अंतर्गत कलह बंद दाराआडच संपला तर ठीक, यामध्ये दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे. पतीने पत्नीला समजून घ्यावे आणि पत्नीने पतीला.. नवऱ्याने पण चूक झाली असेल तर वेळीच सुधारली पाहिजे नाहीतर पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागतेच.. पती-पत्नीच्या नात्यातील अंतर्गत होणारा वाद अनेकदा पोलीस स्टेशना पर्यंत पोहोचला आहे.. अशीच एक घटना पुन्हा खामगाव शहरातून समोर आली आहे. तब्बल १४ वर्षानंतर पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने तक्रार दिली. लग्नानंतर सततच्या छळाला वैतागून एका विवाहितेने पतीविरोधात तक्रार दिली. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 तक्रारीनुसार, ज्योती गोपाल अंदुरे यांचे गोपाल सुरेश अंदुरे यांच्याशी लग्न झाले आहे. लग्नानंतर, १० सप्टेंबर २०२१ ते २ जुलै २०२४ या कालावधीत पतीने तिला सतत मारहाण करत मानसिक छळ केला. दरम्यान १७ एप्रिल २०२४ रोजी पतीने घरातील काच बांगड्यांची तोडफोड केली. असा आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे. महिला समुपदेशन अधिकाऱ्यांच्या पत्रावरून शिवाजीनगर पोलिसांनी पती विरोधात मारहाण करणे, शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.