भीषण अपघात; पुन्हा समृद्धीवरच !! चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला अन्....

 
Jxjjd
सिंदखेडराजा(बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज २ डिसेंबरच्या सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. पण सुदैवाने ट्रकचालक व वाहक बचावले. त्यांना किरकोळ मार लागला असला तरी ट्रक मधील मालाचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे कळाले आहे.
यूपी ६१ टी ९८८२ क्रमांकाचा ट्रक सकाळी समृद्धी महामार्ग वरून नागपूरच्या दिशेने जात होता. नाशिक येथून तेल व कांद्याचा माल घेऊन ट्रक रवाना झाला होता. मात्र सिंदखेड राजा जवळ समृद्धी महामार्गावरच ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक पलटी झाला. अपघातामधील चालक शिवगोविंद यादव (३२ वर्ष रा. उत्तरप्रदेश), वाहक सर्वन यादव (२६ वर्ष) असे जखमींची नावे आहेत.दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्गावरील पोलीस कर्मचारी जखमींच्या मदतीसाठी धावून आले. त्यामध्ये पीएसआय गजानन उज्जैनकर, कॉन्स्टेबल अमोल हरमकर, स्टेशन प्रमुख हनुमान जायभाये, कन्हैया काळे कैलास आघाव अमोल जाधव तसेच महाराष्ट्र सुरक्षा बल चे गोपाल डहाके, भागवत भुसारी, राजेश राठोड, मच्छिंद्र राठोड, अजय पाटील ,शरद वायाळ, यांनी अपघातग्रस्तांना केबिन मधून सुरक्षितरित्या बाहेर काढले व पुढील उपचारासाठी हलविले.