लोणार अजिसपूर मार्गावर भीषण अपघात;अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू! ग्रामस्थ म्हणतात अज्ञात वाहन पोलिसांना ज्ञात! रास्तारोकोने वाहतुकीची कोंडी...
शिराज शेख आयुब (वय ३० वर्ष) असे मृतकाचे नाव असून त्यांना उपचारासाठी छ. संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी अजिसपुर येथून ते दुचाकीने तळणी च्या दिशेने निघाले होते. मात्र रस्त्यातच एका अज्ञात वाहनाने त्यांना मागून धडक दिली. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच तहसीलदार जोशी घटनास्थळावर दाखल झाले होते.
ग्रामस्थांचे "रास्ता रोको आंदोलन!"
दरम्यान या घटनेनंतर
मृतकाच्या नातेवाईकांनी रास्तारोको आंदोलन केले. धडक देणारे वाहन अज्ञात नसून टिप्पर आहे, ते पोलिसांना ज्ञात आहे असा आरोप करण्यात येत होता. पोलिसांनीच धडक देणाऱ्या टिप्परला वाट मोकळी करून दिल्याचीही यावेळी चर्चा सुरू होती. यावेळी बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिस प्रशासनासह महसूल प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान दुपारनंतर या प्रकरणात काहीतरी सेटलमेंट होऊन प्रकरण निपटण्यात आल्याची चर्चा आहे.