शेतीच्या हिस्स्याचा वाद! मारहाण केल्याप्रकरणी लोणार तालुक्यातील पिंपळनेरच्या चौघांवर गुन्हा!

 
घर
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतीच्या हिस्याविषयी वाद कोरत मारहाण केल्याप्रकरणी लोणार तालुक्यातील पिंपळनेरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी वंदना भारशंकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल १२ फेब्रुवारीला प्रकाश भारशंकर, रेखा भालशंकर आकाश भारशंकर तसेच वर्षा जाधव यांच्याविरुद्ध लोणार पोलीस ठाण्यात गून्हाची नोंद करण्यात आली आहे. 
  याबाबत सविस्तर वृत्त असे की, ११ फेब्रुवारीला तक्रारदार वंदना भारशंकर यांच्या मुलाने शेतातील गहू काढून घरी आणले, त्यावेळीच त्यांचे दिर प्रकाश भारशंकर म्हणाले की, या गव्ह्यात माझा सुद्धा हिस्सा आहे, असे म्हणून त्यांनी वाद घातला. पुढे वंदना भारशंकर म्हटल्या की, तुमच्या वडिलांनी तुम्हाला आधीच चार एकर शेती दिली आहे, आमच्याकडील तीन एकरात आम्ही शेती करत उदरनिर्वाह करतो.परंतू त्यांनतर प्रकाश यांनी वंदना यांचा मुलगा अमोल यास लाठीने हातावर वार केला. भांडणाचा आवाज येताच प्रकाश यांनी पत्नी रेखा, मुलगा आकाश ,मुलगी वर्षा, त्याठिकाणी जमले. तेव्हाच वर्षा हातात विळा घेऊन होती, अमोल ने त्यांच्या हातचा विळा हिसकावून बाजूला फेकला. त्यांनतर रेखा भारशंकर यांनी तक्रारदार वदंना यांचे केस ओढले बाकीच्यांनी लोटपाट केली. इतकचं नाही तर जिवे मारण्याची धमकीही दिली. असे वंदना भारशंकर यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. दिलेल्या तक्रारी नुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लोणार पोलीस करत आहेत.