चोरट्यांच्या गुरुजींच्या मोटारसायकलवर डोळा! शेवटी "तेच" केलं..! खामगावची घटना

 
kfgd

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) रात्री आपल्या दारासमोर दुचाकी उभी केली. मात्र  सकाळी बघतात तर  दुचाकी गायब...खामगाव शहरात ही घटना घडली  आहे. 

हल्ली दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या काही टोळ्यांचा छाडा लावला असला तरीही अजूनही दुचाकी चोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही आहे. अशीच एक घटना प्रभूदास दयाराम टिकार (वय वर्ष ४८ रा. अनिकट रोड, खामगाव) यांच्यासोबत घडली आहे. प्रभूदास टिकार यांनी त्यांची एम एच - २८ - एएच - ४८४८ क्रमांकाची हिरो -  होंडा शाईन कंपनीची दुचाकी २० जून रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या घरासमोर उभी केली होती. मात्र २१ जून पहाटे ५-वाजताच्या दरम्यान त्यांची दुचाकी घरासमोर दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र मिळाली नाही. आपली दुचाकी चोरीला गेली आहे. हे कळल्यानंतर प्रभुदास टिकार यांनी तशी तक्रार ३ जून रोजी खामगाव पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलिसांनी टिकार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोहर गोरे करीत आहेत.