Amazon Ad

EXCLUSIVE धक्कादायक! बुलडाणा जिल्ह्यात ५ महिन्यांत ५१ बलात्कार; बलात्काराचे गुन्हे ३८ टक्क्यांनी वाढले,पण....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ही बातमी केवळ पोलिसांचीच नव्हे समाजाची देखील चिंता वाढवणारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत ५१ बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद आहे. सर्वच गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे..मात्र बलात्कार होतातच का? यावर चिंतन होणे गरजेचे आहे.
 बुलडाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात बलात्काराच्या ५१ गुन्ह्यांची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ३८ बलात्काराची गुन्हे नोंदविण्यात आले होते..यंदा त्यात १४ गुन्ह्यांची वाढ झाली आहे. टक्केवारीचा विचार करता यंदा बलात्काराच्या घटनांचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले आहे.
 आकडा का वाढतो? खरे गुन्हे किती?
खरेतर असा सवाल उपस्थित करणेही काहींना चुकीचे वाटू शकते. मात्र बलात्काराच्या बऱ्याच प्रकरणांत न्यायालयात गेल्यानंतर "दूध का दूध आणि पाणी का पाणी" होते. आधी इश्क, नंतर सहमतीने शरीर संबंध आणि नंतर काही कारणाने ब्रेक-अप झाला तर मात्र बलात्काराची तक्रार हा फंडा सध्या ट्रेंडिंग ला आहे. अशा प्रकरणात न्यायालयाने वारंवार मते नोंदवली आहेत. प्रेमात असताना सहमतीने शारीरिक संबंध झाल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानेही नोंदवले आहे.
बऱ्याचदा तक्रार दाखल करीत असतानाच पोलिसांना नेमके प्रकरण काय हे ध्यानात येते..मात्र जशी तक्रार आली तशी दाखल करायची असा नियम असल्याने पोलीस तक्रार दाखल करून घेतात त्यामुळे बऱ्याचदा बलात्कारांच्या गुन्ह्यांचा आकडा वाढलेला दिसतो. काही गंभीर आणि खऱ्या प्रकरणांत पोलीस मात्र लगेच ॲक्शन घेतात.