खळबळजनक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला डिझेलच्या टाकीत; हत्या की आत्महत्या? नांदुऱ्यात खळबळ

 
Nandura
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाचा थेट मृतदेहच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अपहरणाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या तरुणाच्या शोधासाठी पोलीस फिरत होते, मात्र  आरोपी तरुण हाती लागण्याऐवजी त्याचा थेट मृतदेह हाती लागला. नांदुरा - मलकापूर रस्त्यावरील नायगाव फाट्याजवळ एका बायोडिझेल च्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळला.

 वेदांत कैलास सपकाळ(२२, रा.नायगाव ता.नांदुरा) असे मृतक तरुणाचे नाव आहे. नांदुरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून वेंदात विरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस वेदांतचा शोध घेते होते. दरम्यान वेदांत शुक्रवारी संध्याकाळी वेदांतचा मृतदेह बायोडिझेलच्या टाकीत आढळून आला.

    मृतक वेदांत हा बायोडिझेलच्या पंपावर चौकीदार म्हणून काम करीत होता. वेदांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली?  बायोडिझेल च्या टाकीत मृतदेह आढळून आल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला बायोडिझेलचा साठा वैध आहे का? असे विविध प्रश्न आता पोलिसांसमोर निर्माण झाले आहेत. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.