खळबळजनक! चिखली तालुक्यात आणखी एक प्रेत सापडले! अंबाशी फाट्यावर आढळला...

 
dff
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील तपोवन देवी संस्थान परिसरात दोन दिवसांपूर्वी ६ वर्षीय चिमुकलीचा गळा आवळून खून झाला होता. आज,१५ मे रोजी सकाळीआणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखली तालुक्यातील अंबाशी फाट्यावर एका पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय.
 

अंबाशी फाट्यावरील श्री.वाळेकर यांच्या शेतात हा मृतदेह दिसला आहे.  साखरखेर्डा  पोलीस स्टेशन हद्दीतील तांदूळवाडी येथील ज्ञानेश्वर बुंदे(४५) यांचा हा मृतदेह असल्याचे सांगण्यात आले. मृतदेहाशेजारी विषाची बाटली आढळून आल्याने बुंदे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे. ज्ञानेश्वर बंदे यांनी टोकाचे पाऊल का उचलले? यासाठी अंबाशी फाट्यावरील जागा का निवडली? याबाबतचा तपास चिखली पोलिसांना करावा लागणार आहे. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.गावंडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.