खळबळजनक! बातमी वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल!१० व्या वर्गातल्या २ सख्या चुलत भावांवर अनैसर्गिक बलात्कार; सायन्स लॅब मध्ये मास्तर करत होता "भलतेच प्रयोग"!

प्रॅक्टिकल परिक्षेत नापास करण्याची देत होता धमकी! हॉस्टेलमध्ये राहत होते विद्यार्थी; शिक्षकाच्या नात्याला  काळीमा फासणारी बुलडाण्यातील घटना...

 
Ghhh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हो...ही बातमी वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात  गेल्याशिवाय राहणार नाही. बुलडाणा तालुक्यातील एका नामांकित शाळेतील वासनांध विकृत मास्तरने २ विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केलाय. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असून सध्या वर्ग १० वीत आहेत. दोन्ही पीडित विद्यार्थी नात्याने सख्खे चुलत भाऊ आहेत. प्रॅक्टिकल परीक्षेत नापास करीन अशी धमकी देत ५० वर्षाच्या म्हाताऱ्या मास्तरने विद्यार्थ्यांना आपल्या वासनेचे शिकार बनवले.  सायन्स शिकवणाऱ्या मास्तरने शाळेच्या लॅब मध्ये वेगळेच प्रयोग केले.  बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात २६ फेब्रुवारीच्या रात्री याप्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून वासनांध मास्तरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
    

 धर्मेंद्र उत्तम हिवाळे (५०, रा बुलडाणा) असे नराधम मास्तरचे नाव असून तो सायन्सचा शिक्षक आहे. पिडीत दोन्ही विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील एका गावाचे रहिवासी असून १० व्या वर्गात त्यांनी बुलडाणा  येथील एका नामांकित विद्यालयात प्रवेश घेतला होता. दोघेही भाऊ विद्यालयाच्या हॉस्टेल मध्ये राहत होते.

  
 दुपारचा लंचब्रेक अन् मास्तरची भूक..!

   पिडीत १५ वर्षीय मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार महिभरापूर्वी दुपारी लंच ब्रेकमध्ये तो मेसकडे जेवायला जात होता. त्याचवेळी धर्मेंद्र हिवाळे याने त्याला थांबवले. मुलाचा उजवा हात हातून धरून मास्तर वाईट उद्देशाने हात चोळू लागला. त्यानंतर मास्तर "हिवाळे" तिथून निघून गेला.
   
महाशिवरात्रीच्या सुट्टीच्या दिवशी..!
   
पिडीत मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीची सुट्टी होती. हॉस्टेलच्या मुलांवर लक्ष ठेवण्याची दुसऱ्या शिक्षकाची ड्युटी असताना सुद्धा आरोपी धर्मेंद्र हिवाळे तिथे आला. पिडीत मुलगा दुपारी जेवणासाठी मेस कडे जात असताना धर्मेंद्र हिवाळे याने मुलाला बोलावले व स्कूल बिल्डिंग मधील सायन्स लॅब मध्ये नेले. तिथे मुलाचे कपडे काढून त्याच्या गुप्तांगाशी अश्लील चाळे केले.त्यानंतर मास्तरने मुलाला सोडून दिले. २० मार्चच्या दुपारी सुध्दा तसाच प्रकार घडल्याचे मुलाने तक्रारीत म्हटले आहे.
    
मास्तर म्हणाला तुझ्या भावाला पाठवून दे..!
    
 २१ मार्चला शाळा भरण्याच्या वेळेस सायन्स लॅब मध्ये मुलावर धर्मेंद्र हिवाळे याने नैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तुझ्या भावाला पाठवून दे असे धर्मेंद्र हिवाळे याने मुलाला सांगितले. दरम्यान त्यानंतर पीडित मुलाने त्याच्या चुलत भावाला मास्तरचा निरोप सांगितला. त्यामुळे त्याचा चुलत भाऊ सुद्धा सायन्स लॅब मध्ये गेला. तिथे धर्मेंद्र हिवाळे याने तक्रारदार मुलाच्या चुलत भावालाही वासनेचा शिकार बनवले.
    
  २२ मार्चच्या दुपारी दोन्ही भाऊ टॉयलेट मध्ये लपले..!
    
 २२ मार्चच्या दुपारी मास्तरने मुलांना पुन्हा लॅब मध्ये बोलावले. मास्तरच्या गैरकृत्यांनी परेशान झालेल्या दोन्ही मुलांनी टॉयलेट मध्ये लपण्याचा निर्णय घेतला. दोघे भाऊ टॉयलेट मध्ये लपले, थोड्या वेळाने इतर मुले टॉयलेट मध्ये आल्यानंतर दोन्ही भाऊ इतर मुलांसोबत जाऊ लागले. त्यावेळी मास्तर हिवाळे याने इतर मुलांना दुसरीकडे जायला सांगितले व दोन्ही मुलांना सायन्स लॅब मध्ये बोलावले. तिथे आळीपाळीने दोन्ही मुलांवर बलात्कार केला. २३ मार्चला तक्रारदार मुलाच्या चुलत भावासोबत धर्मेंद्र हिवाळे याने पुन्हा अश्लील चाळे केले. मास्तरच्या कारनाम्यांनी परेशान झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांनी ही बाब मुख्याध्यापकांना व फोनद्वारे घरच्यांना कळवली. अखेर २७ फेब्रुवारीच्या रात्री बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून धर्मेंद्र हिवाळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहे. तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील करीत आहेत.