खळबळजनक! लोणार मध्ये तरुणाच्या पोटात चाकू खुपसून खून! वाईनबार समोर जुना वाद उफाळला; तिघांनी मिळून एकाचा गेम केला..

 
hjkl;
लोणार( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा); जुन्या वादातून एका तरुणाचा पोटात चाकू खुपसून खून केल्याचा धक्कादायक प्रकार लोणार शहरातून समोर आला आहे. ज्या तरुणाचा खून करण्यात आला तो अवघा २० वर्षाचा आहे. त्याचे मारेकरी देखील त्याच्याच वयाचे आहेत. रितेश सुनील मापारी रा.लोणार असे मृतक  तरुणाचे नाव आहे.
 

प्राप्त माहितीनुसार रितेश काल रात्री लोणार शहरातील तेजस वाईन बार अँड रेस्टॉरंट येथे जेवायला गेला होता. हॉटेलच्या समोरच त्याचा शुभम नारायण मापारी (२२), उदय विनोद सातपुते (१९, दोघे रा.लोणार)व शुभम उर्फ विशाल भारस्कर (२२, गारटेकी, ता.मंठा) यांच्यासोबत वाद झाला. त्यांचा जुना वाद होता, तो वाद उकरून तिघांनी रितेशला शिवीगाळ केली त्यानंतर बेदम मारहाण केली. दोघांनी रितेशचे  हाथ व पाय पकडून ठेवले आणि शुभम भारस्कर याने हातातील चाकूने त्याच्या पोटात वार केले.

  यावेळी जखमी अवस्थेतील रितेशला नागरिकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथे नेण्यात आले.तिथे डॉक्टरांनी त्याला मृत  घोषित केले. याप्रकरणी रितेशच्या रितेशच्या वडिलांनी लोणार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खून करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.