

खळबळजनक! बुलडाण्याजवळच्या राजूर घाटात ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; ८ जणांनी मिळून इज्जत लुटली! आमदार संजय गायकवाडांचा पोलीस ठाण्यात ३ तास ठिय्या
प्राप्त माहितीनुसार पीडित महिला ही बुलडाणा तालुक्यातील एका गावातील आहे. तिच्या नातेवाईकासोबत मोटारसायकलीने घाटात फिरत होते. घाटातील देवीच्या मंदिराजवळ ते थांबले असता ८ जणांचे एक टोळके तिथे आले.
जाहिरात
त्या टोळक्याने महिलेला बाजूला नेले, तिच्यासोबत असलेल्या नातेवाईकाच्या गळ्यावर चाकू लावून विवाहितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत असलेली रोख रक्कम देखील बलात्काऱ्यांनी काढून घेतली. घटनेनंतर बलात्कारांनी घटनास्थळावरून पळ काढला. आमदार संजय गायकवाड यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन गाठले. आरोपीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल व्हावा यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. रात्री उशिरा ८ अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी एका आरोपीची ओळख पटली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेचा तपास करून अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.