अशीही कर्तव्यदक्षता... सेवानिवृत्तीला अवघे काही तास बाकी तरी ठाणेदार रस्त्यावर..!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवघे काही तास सेवानिवृत्तीला बाकी असतानाही बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यकठोर ठाणेदार प्रदीप साळुंखे आज, ३१ डिसेंबरला नेहमीप्रमाणे रस्त्यावर बंदोबस्तासाठी उतरल्याचे दिसले.
श्री. साळुंखे आज, ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या २२ महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वाधिक व्यस्त ठाणे असलेल्या बुलडाणा शहराचा कार्यभार ते सांभाळत होते. अतिशय शिस्तप्रिय आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ते शहरवासीयांच्या नेहमीच स्मरणात राहतील. थर्टिफर्स्टच्या निमित्ताने कडक बंदोबस्ताचे नियोजन श्री. साळुंखे यांनी केले. शहर पोलीस ठाण्यात आज दुपारी त्यांचा निरोप समारंभ पार पडला. त्यानंतर दिवसभर शहरातील अनेकांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याधिकाऱ्यांनी आज, ३१ डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे कोविड विषयक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी ते पुन्हा रस्त्यावर उतरले. शहरातील चौकाचौकात लावलेला बंदोबस्त नीट आहे का यासाठी ते शहरात फिरताना दिसले.