वाढत्या कर्जामुळे शेत विकले तरी कर्ज फिटेना...! अंत्रिकोळीच्या शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला...

 
madan

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चिखली तालुक्यातील अंत्रिकोळी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. ११ सप्टेंबरला ही घटना घडली. मदन त्र्यंबक शिंदे(५०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मदन शिंदे यांनी मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते.त्यांच्यावर बँकेचे व काही खाजगी कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे कमी उत्पन्न होत असल्याने त्यांना कर्ज फेडीसाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. या विवंचनेतच मदन शिंदे यांनी गावातील समाधान मोरे यांच्या टीनशेडला असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. रायपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.