दुचाकी अपघातात अटाळीचा वृद्ध ठार!

खामगाव तालुक्यातील दुर्घटना
 
धावत्या दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर, मोताळा तालुक्‍यातील अपघात
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास मेहकर-खामगाव रस्त्यावरील निळेगाव फाट्याजवळ घडली. अपघात झाल्यानंतर कापसाने भरलेला एक भरधाव आयशर तिथून गेल्याची माहिती अपघाताच्या दहा मिनिटांत तिथे पोहोचलेल्या नागरिकांनी दिली.
महादेव अंभोरे (५६, रा. अटाळी, ता. खामगाव) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंभोरे हे खामगाव येथून दुचाकीने अटाळीकडे परत येत होते. निळेगाव फाट्याजवळ त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.