आयशरला मोटारसायकल मागून धडकली! बापाचा घटनास्थळीच चेंदामेंदा झाल्याने मृत्यू; लेकीवर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू! चिखली - मेहकर रस्त्यावर अपघात

 
crime
मेहकर( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली - मेहकर रस्त्यावरील नांद्रा धांडे फाट्यावर काल,१ एप्रिलच्या सायंकाळी भीषण अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला उभे केलेले आयशर वाहन रस्त्यावर आणतांना मोटारसायकल आयशर ला मागून धडकली. या अपघातात मोटारसायकलवरील बापाचा जागीच मृत्यू झाला तर लेक गंभीर जखमी झाली. गजानन पांडुरंग म्हस्के( ४०,रा. ब्रह्मपुरी, ता.मेहकर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांची मुलगी कु. भक्ती  गंभीर जखमी झाली आहे.
 

 गजानन म्हस्के व त्यांची मुलगी मोटारसायकलने मेहकर वरून हिवरा आश्रम कडे जात होते. त्याच वेळी रस्त्याच्या बाजूला उभे केलेले आयशर वाहन रस्त्यावर आणत असताना म्हस्के यांची मोटारसायकल आयशर ला मागून धडकली. या भीषण अपघातात आयशर वाहनांचे चाकच म्हस्के यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी भक्ती ही रस्त्यावर फेकल्या गेली.तिचा हात फ्रॅक्चर असून छातीला देखील मार लागला आहे. पुढील उपचारासाठी तिला छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले आहे.