२०२२ मध्ये या १२ दिवसांत ध्वनीक्षेपकांना मध्यरात्री १२ पर्यंत परवानगी!

 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत पुढील वर्षात सूट देण्यात येणारे १२ दिवस जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय ३ दिवस राखीव ठेवण्यात आले असून, महत्त्वाच्या वेळी व गरज भासल्यास त्या त्या वेळी ते निश्चित करण्यात येतील.

ध्वनी मर्यादेचे व तरतूदींचे उल्लंघन होणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणासंबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी कळविले आहे. सूट देण्यात येणारे हे आहेत 12 दिवस ः शिवजयंती, ईद ए मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणपती उत्सवातील दुसरा, पाचवा, गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशीचा दिवस, नवरात्री उत्सवाचे अष्टमी व नवमीचा दिवस, लक्ष्मीपूजन व 31 डिसेंबर २०२२.