दारूड्याचा मध्यरात्री धिंगाणा! आठ जणांना काठीने ठोकले; एक गंभीर, नागपूरला हलविले!खामगाव तालुक्यातील घटना..

 
Vhfg
खामगाव(भागवत राऊत:बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): दारुड्याने काठी हातात घेऊन मध्यरात्री गावात धिंगाणा घालून आठ जणांना काठीने मारल्याची घटना खामगाव तालुक्यात घडली आहे.
गणेश सीताराम दिवनाले (वय वर्ष -३६ रा. भालेगाव बाजार ता.खामगाव ) असे धिंगाणा घालणाऱ्या दारुड्याचे नाव आहे. गणेश दिवनाले याने २३ जूनच्या माध्यरात्री ३.३० वाजताच्या दरम्यान काठी हातात घेऊन गावात धिंगाणा घातला होता.संतोष शत्रुघ्न संबारे (वय वर्ष - २२ रा.भालेगाव बाजार, ता - खामगाव) हा स्वतःच्या अंगणात झोपलेला होता, यावेळी गणेश दिवनाले हा हातात काठी घेऊन आला कोणतेही कारण नसतांना झोपेत असलेल्या संतोष संबारे याला काठीने डोक्यात, अंगावर जोरात काठ्या मारून गंभीर जखमी केले. संतोष गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. याचवेळी शेजारी राहणारे सदाशिव देवराव एकडे (वय वर्ष -६६), सौ तुळसाबाई सदाशिव इकडे (वय वर्ष -६२), सागर राजेश हुरसाड (वय वर्ष -२६),संजय प्रल्हाद हुरसाड (वय वर्ष -४८),सौ सविता शत्रुघ्न संबारे (वय वर्ष -३८), सुनीता राजेश हुरसाड (वय वर्ष -४७), अनुराधा प्रकाश कोल्हे (वय वर्ष -२३) यांनी गणेश सीताराम दिवनाले याला रोखण्याचा प्रयन्त केला, मात्र यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गणेशने सर्वांना काठीने मारहाण करून जखमी केले आहे. 
  याप्रकरणी सौ अर्चना रमेश एकडे (वय वर्ष -३७) यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे. पोलिसांनी सौ अर्चना एकडे यांच्या तक्रारीवरून गणेश दिवनाले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.पुढील तपास एपीआय सतीश आडे करीत आहेत.