दारूच्या नशेत किटकनाशक प्याला... जागीच कोसळला!; खामगाव तालुक्‍यातील घटना

 
विष प्राशन करून युवकाची आत्महत्या; मोताळा तालुक्‍यातील घटना
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारूच्या नशेत पिकांवर फवारायचे किटकनाशक पिल्याने ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्‍यू झाला. ही घटना मोताळा तालुक्‍यातील गिरोली येथे आज, १६ नोव्‍हेंबरला पहाटे समोर आली. दुपारी दीडला पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली.
शंकर गोटीराम राठोड (रा. गिरोली ता. मोताळा) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. सुनिल रामदास राठोड (३७, रा. मोहेगाव ता. मोताळा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की त्यांचे काका शंकर राठोड दारू पिण्याच्या सवईचे होते. दारूच्या नशेत त्यांनी घरातील शेती उपयोगी मोनोसिल कीटकनाशक प्राशन केले. यामुळे त्‍यांचा मृत्यू झाला. तपास पोलीस अंमलदार जावेद शेख करत आहेत.