बहिणीच्या चारित्र्यावर संशय; जावयासह वडिलांना मारहाण! खामगाव शहरातील घटना..

 
खामगाव
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या कारणावरून जावयासह वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
याप्रकरणी विजय प्रल्हाद वाडेकर यांनी तक्रार नोंदविली. त्यानुसार १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजे दरम्यान विजय वाडेकर हे घरी जेवण करीत असताना त्यांचा मोठा भाऊ रितेश वाडेकर हा घरी आला व म्हणाला की, तुझे साळे रघुनाथ विश्वनाथ घोपे व गणेश विश्वनाथ घोपे (रा. भालेगाव बाजार) हे माझ्यासोबत वाद घालत आहेत. तू माझ्यासोबत घरी चल असे म्हटले असता, फिर्यादी विजय वाडेकर वडिलांसह त्यांच्या भावाच्या घरी गेले. त्यावेळी दोघांनी त्यांना सांगितले की, तुमचा भाऊ माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतो व तिला तू दारू पिते असे म्हणून त्रास देतो. त्यानंतर त्यांनी वाद घातला. लकी घोपे याने फिर्यादी विजय वाडेकर यांना पाठीमागून पकडून ठेवले व रघुनाथ गोपे यानी त्याचे हातातील हिरव्या रंगाचा फायबरचा फावड्याचा दांडा डोक्यावर मारला. त्यामुळे डोक्याला जखम होवून रक्त निघाले होते. आणि गणेश गोपे यांनी त्याचे हातातील दगड वडील प्रल्हाद वाडेकर यांच्या उजव्या डोळ्यावर मारल्याने ते जखमी झाले आहेत. तुम्हाला जीवाने मारून टाकू अशी धमकीही दोघांनी दिली. असे तक्रारीत म्हटले आहे.