आई रागावली म्हणून कुणी असं करत का? वाचा खामगावच्या पुजाने काय केलं! पुण्याला जाऊन...

पूजा शशिकांत सातपुते असे तरुणीचे नाव आहे. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार पूजाच्या बहिणीला नोकरी लागली होती. हा धागा पकडून बहिणीला नोकरी लागली, ती तिच्या पायावर उभी राहिली असे म्हणत आई पुजावर रागावली. पुजाला याचा खूप राग आला. पुजाने थेट पुणे गाठले. तिथे मैत्रिणीच्या मदतीने खासगी कंपनीत नोकरी मिळवली. पुण्यातील वाघोली परीसरातील एका मुलींच्या वसतिगृहात राहून नोकरी सुरू केली.मात्र इकडे मुलगी निघून गेल्याने आई वडील हैरान - परेशान झाले. सगळीकडे शोधाशोध घेऊनही पूजाचा पत्ता न लागल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली.
पोलिसांनी आईचा तक्रार नोंदवल्यानंतर एक पथक पूजाच्या शोधासाठी पुण्यात पाठवले. मोबाईल लोकेशन वरून पूजाचा शोध घेण्यात आला. काल पूजाला खामगावात परत आणण्यात आले. पोलिसांनी पुजाचे समुपदेशन केले आणि गैरसमजातून घडलेल्या या प्रकारचा शेवट अखेर गोड झाला.