बुलडाण्याच्या आशिष चोपलेला तुम्ही ओळखता?

ओळखत असाल तर ही बातमी वाचा...
 
बुलडाणा शहर पोलीस ठाणे
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका व्यक्तीचा १९ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
१५ नोव्हेंबर रोजी डोक्याला मार लागल्याने त्याला वॉर्ड क्रमांक ८ मध्ये भरती करण्यात आले होते. त्यावेळी त्याचे नाव आशिष चोपले (रा. बुलडाणा) असल्याचे त्याने सांगितले होती. मात्र याव्यतिरिक्त कोणतीही ओळख त्याला सांगता आली नव्हती. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आशिष चोपले असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी  केले आहे. संपर्कासाठी क्रमांक : ९८९०९०५९८३