शेतीच्या वाद पेटला! खामगाव तालुक्यात दोघांचा खून! अंगावर मिरची पावडर फेकली, पोटात चाकू खुपसला! दोन महिला गंभीर जखमी

 
kjlkdssd
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतीच्या वादातून खामगाव तालुक्यातील चिंचपुर येथे दोघांचा खून झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. दोन गटात शेतात हा वाद झाला. एका गटाने दुसऱ्या गटावर जोरदार हल्ला चढवला, मिरची पावडर फेकली. लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण आणि चाकूने भोसकण्यात आले. यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. संपूर्ण जिल्हा समृध्दीवरील अपघातामुळे शोकसागरात बुडाला असताना १ जुलैच्या दुपारी ही घटना घडली.
 

शेख कासम शेख जान मोहम्मद (२३) मोहम्मद खान तुराबखा(३४) दोघे रा. चिंचपूर अशी खून झालेल्यांची नावे आहेत. शेतीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. मारहाण करणारे आरोपी ४ आरोपी चिंचपुर तर तिघे मेहकर येथील आहेत.

 प्राप्त माहितीनुसार चिंचपुर येथील गट न २७९, २८० मध्ये मृतक व जखमींकडून पेरणी सुरू होती. त्यावेळी  एका गटाने जबरदस्ती जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन गटात तुंबळ राडा झाला. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. शेख जावेद खान यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यापैकी ५ आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. तपास हिवरखेडचे ठाणेदार गजानन वाघ करीत आहे.