Amazon Ad

स्वतः च्या लग्नासाठी आटापिटा! ३० वर्षीय महिलेचे केस ओढून भिंतीवर आपटले! शेगावची संतापजनक घटना.. वाचा काय आहे प्रकरण!

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लग्न करण्यासाठी उतावळा झालेल्या एकाने चक्क ३० वर्षीय महिलेला लाता बुक्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर, महिलेने लग्नासाठी नकार दिला म्हणून तिचे केस ओढून भिंतीवर आदळले! शेगाव शहरातील एका नगरात ही घटना घडली. 
  याप्रकरणी पिडीत ३० वर्षीय महिलेने शेगाव पोलीसांत तक्रार दिली. यावरून, शेख फारूक याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शेख फारुख हा एके दिवशी पिडीते जवळ आला ' मी माझे मायबापाला सोडून दिले, तू माझ्यासोबत लग्न कर ! 'माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी तुला दुसऱ्या सोबत पण लग्न करू देणार नाही' असे म्हणत त्याने पिडीत महिलेला धमकाविले. परंतु तिने लग्नासाठी नकार दिला. मला तुझ्या सोबत लग्न करायचे नाही असे पिडीतेने म्हटले असता संतप्त झालेल्या शेख फारुक याने तिचे केस पकडुन ओढतान केली. इतकेच नाही तर, डोके धरून जवळ असलेल्या एका घराच्या भिंतीवर आपटले. व क्रूरपणे मारहाण केली. तुझ्या घरी येऊनही तुला मारहाण करतो. अशी धमकी देऊन तो निघून गेला. असे तक्रारीत म्हटले आहे. पिडीत ३० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून शेख फारूक याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.