थ्रेशरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना

 
file photo
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः थ्रेशर मशिनमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज, ४ डिसेंबरला दुपारी दोन वाजता अंढेरा शिवारात (ता. देऊळगाव राजा) घडली.
दीपक अनिल इंगळे (१८, रा. अंढेरा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दीपक गावातीलच लक्ष्मण सानप यांच्या ट्रॅक्टरवर मजूर होता. आज दुपारी मधुकर देशमुख यांच्या शेतात तूर काढणीचे काम सुरू होते. त्यावेळी मशीनमध्ये हात अडकल्याने दीपक मशीनमध्ये अडकला आणि त्याचा  मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंधेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.