"बाबा मला शोधू नका मी त्याच्यासोबत आहे" चिठ्ठी लिहून २० वर्षीय तरुणी घरातून निघून गेली! वडिलांना धक्काच बसला, शेगाव येथील घटना..

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) "मला शोधू नका मी त्याच्यासोबत आहे" अशी चिठ्ठी वडिलांच्या उशाखाली सोडून एका २० वर्षीय युवतीने घरातून पलायन केल्याची धक्कादायक घटना शेगाव येथे घडली आहे.

प्रकरणी काल शुक्रवार ३ मे रोजी युवतीच्या वडिलांनी  शहर ठाण्यात तक्रार दिली.  दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रात्री घरी झोपलेले असताना पहाटे ३ च्या सुमारास घरी कोणाला काहीही न सांगता मुलगी निघून गेली. जाताना तिने एक चिठ्ठी लिहिल्याचे आढळून आले. चिठ्ठी पाहून वडिलांना धक्काच बसला होता.  त्यामध्ये बाबा, आता तुम्ही मला शोधू नका, मी त्याच्या सोबत आहे असे लिहिले होते. तसेच तिने घरून जाताना मोबाईल किंवा इतर कोणतेही कागदपत्रे सोबत नेले नाहीत. तरी मुलीचा शोध घेण्यात यावा अशी विनंती तक्रारद्वारे  करण्यात आली आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केले आहे. पुढील तपास  जमादार विनायक सरोदे करत आहेत.