तलवारीने केक कापून केला राडा;धामणगाव बढेच्या चौघांवर गुन्हा !

 
Fhmm

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मोताळा तालुक्यातील धामणगाव बढेत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे चौघांना महागात पडले. बेकायदेशीर तलवार बाळगल्याने तसेच व्हिडिओ इंस्टाग्राम वर प्रसारित केल्याने चौघांविरुद्ध धा.बडे पोलीस ठाण्यात आर्मॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ डिसेंबरला मोहन सपकाळ याचा वाढदिवस होता. मित्रांनी वाढदिवस साजरा करण्याकरिता जय्यत तयारी केली. रात्री ९:३० वाजेच्या सुमारास मित्र जमले. मात्र वाढदिवस तलवारीने केक कापुन झाला. 
  इतकच नाही तर केक कापल्यांनतर तलवार मिरवतानाचा व्हिडिओ इंस्टाग्राम अँप वर प्रसारित केल्या गेला. व्हिडियो सुसाट व्हायरल झाला. पोलीसांनी तपासचक्रे फिरवली त्यांनतर राहुल काटे, मोहन सपकाळ, सागर काटे, अविनाश वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व धा. बढे येथीलच रहिवासी आहेत. पुढील तपास पोहेको सुरेश सोनवणे करीत आहेत.