चिखलीच्या जिजाऊ नगरात राडा! "तू फक्त दिस..हात पाय तोडून टाकतो" म्हणे...!

 
Jxjxj
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २४ डिसेंबरच्या रात्री चिखलीतील जिजाऊ नगरात राडा झाला. शुल्लक कारणाने घरासमोर राहणाऱ्या अरुण पाटील यानी वाद घातला. तसेच कुटुंबातील लोकांना मारहाण केल्याची तक्रार महादेव खिरोडकर यांनी २५ डिसेंबरला चिखली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अरुण पाटील, नचिकेत पाटील (रा. जिजाऊनगर चिखली) व मधुकर ठेंग (रा. मकरध्वज खंडाळा) याच्यासह इतर ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना २४ डिसेंबरच्या रात्रीची आहे. तक्रारदार खिरोडकर यांचा मुलगा विजय नातेवाईकांच्या घरून आल्यानंतर रात्री ८:३० वाजता घरासमोरील अरुण पाटील यांनी 'तू बँकेचे लोन कधी भरणार तुला बँकेकडून अटक होऊ शकते 'असे सांगितले. त्यावर विजयने मी पैसे भरतो आहे असे सांगितले, त्यानंतर घरी येऊन घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर विजयने पुढील पैसे देखील भरणार असल्याचे अरुण पाटील यांना सांगितले. मात्र त्याचवेळी त्यांचा मुलगा नचिकेत पाटील हातात रॉड घेऊन आला आणि त्यांनी विजयची कॉलर पकडली व पायावर वार केला. त्यानंतर तेथे मधुकर ठेंग (रा. मकरध्वज खंडाळा) याच्यासह अज्ञात चार ते पाच जण आले. घरात घुसून अंगणातील जिन्याचे रेलिंग चे रॉड तोडून त्यांनी विजयला मारहाण केली. त्यावेळी विजयची मधुकर ठेंग यांच्यासह इतरांसोबत झटपट झाली.
त्यावेळी वाद सोडवत असताना महादेव मारोडकर यांनासुद्धा मारहाण करण्यात आली. मध्येच त्यांच्या पत्नी अनिता खोरडकर भांडण सोडवण्यासाठी आल्या त्यांना सुद्धा लोटपाठ करण्यात आली. व विजय मारोडकर याला "तू मकरध्वज येथील शाळेत दिसला तर तुझे हात पाय तोडून टाकेल" अशी धमकी देत सर्व निघून गेले. त्यानंतर महादेव खिरोडकर हे त्यांचा मुलगा विजयसह तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले, आधी पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले त्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.