भरधाव वाहनाने चिरडले; दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू; चिखलीच्या अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज जवळ झाला अपघात..!

 
jyhf
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. काल, ३ नोव्हेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास चिखली साकेगाव रोडवरील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज जवळ हा अपघात . धीरज विजय अंभोरे(२१, रा. अंत्री कोळी, ता.चिखली) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 प्राप्त माहितीनुसार धीरज हा गावातील एका ट्रॅक्टर वर चालक होता. काल रात्री तो मोटारसायकल ने चिखलीकडे जात असताना अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज जवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तो अक्षरशः चिरडल्या गेल्या. अपघातानंतर अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन घटनास्थळा वरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने त्याला  चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  धीरजच्या पश्यात आई, वडील व दोन मोठे भाऊ असा परिवार आहे. तपास चिखली पोलीस करीत आहेत.